जिल्ह्यात ४९ हजार ६१९ रुग्ण कोरोनामुक्त ; १० हजार ३६२ रुग्णांवर उपचार सुरू….

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि.१९) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४९  हजार ६१९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १० हजार ३६२ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ११३९  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

हे ही वाचा:  स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३७५, चांदवड १०९, सिन्नर ६८२, दिंडोरी १८७, निफाड  ७७१, देवळा ४४,  नांदगांव २८१, येवला ९४, त्र्यंबकेश्वर ७५, सुरगाणा २२, पेठ १७, कळवण ७९,  बागलाण २०२, इगतपुरी २९३, मालेगांव ग्रामीण २४८ असे एकूण ३ हजार ४७९  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६ हजार २५२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५५५  तर जिल्ह्याबाहेरील ७६ असे एकूण १० हजार ३६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ६१  हजार १२०  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७५.४१,  टक्के, नाशिक शहरात ८३.५७ टक्के, मालेगाव मध्ये  ७९.२१  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७०.८६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८१.१८  इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ३४५, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ६३० मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १३८  व जिल्हा बाहेरील २६ अशा एकूण ११३९  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

हे ही वाचा:  स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

(वरील आकडेवारी आज (दि.१९) सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790