धुळे हादरलं! 22 वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू; गेल्या 24 तासांत दुसरा बळी

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता धुळ्यातही कोरोनाने हातपाय पसरवले आहे. धुळ्यात गेल्या 24 तासांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आज (दि. ११ एप्रिल २०२०) एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

धुळे जिल्ह्यात शुक्रवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दोघांपैकी पैकी एका 53 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला होता. तर 22 वर्षीय तरुणीवर उपचार सुरू होते. परंतु, आज उपचारादरम्यान, या तरुणीचाही मृत्यू ओढावला. धुळे जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केला असून साक्री येथील 53 वर्षीय प्रोढाचा मृत्यू कोरोनाविषाणुमुळे झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाला धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले होते. तिथे शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांना क्षयरोगही होता. हा धुळे जिल्ह्यातील पहिला कोरोना बळी होता.

हे ही वाचा:  मोठी बातमी! उज्जवला योजना लाभार्थींना 600 रुपयांत गॅस सिलेंडर !

याशिवाय विलगीकरण कक्षात दाखल मालेगाव येथील 22 वर्षीय तरुणीचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. तिच्यावर उपचार सुरू होते. ही तरुणी मालेगाव येथून धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. आज, पहाटे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बळीचा आकडा हा दोनवर पोहोचला आहे.

धुळ्यात संचारबंदी लागू

राज्यात ठिकठिकाणी संसर्गजन्य कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर आतापर्यंत धुळे जिल्हा सुरक्षित होता. चौफेर सीमेलगतच्या जळगाव, नाशिक, मालेगाव, शिरपूर सीमेलगत सेंधव्यापर्यंत आणि साक्री- नवापूर सीमेलगतच्या सुरतपर्यंत कोरोनाने पाय पसरले. त्यामुळे धुळे जिल्ह्याची झोप उडाली. या पार्श्‍वभूमीवर सरकारी यंत्रणेने धुळे जिल्ह्यात शुक्रवारी रात्री बारापासून रविवारी पहाटे पाचपर्यंत आरोग्य सेवा वगळता पूर्णतः संचारबंदी, लॉक डाऊनचा आदेश बजावला आहे.

हे ही वाचा:  मोठी बातमी! उज्जवला योजना लाभार्थींना 600 रुपयांत गॅस सिलेंडर !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790