नाशिक (विशेष प्रतिनिधी): वैजापूर, जिल्हा औरंगाबाद येथील 19 वर्षांच्या युवकाला करोना संशयीत म्हणून शुक्रवारी सिविल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचं स्वाबचा नमुना पुण्याला पाठवण्यात आला होता.. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला..
त्याला आरोग्य विभागाचे कर्मचारी चेस्ट एक्स-रे काढण्यासाठी नेत असताना तो सिव्हील हॉस्पिटलमधून पळून गेला. तो आपल्या जिल्ह्यातील रहिवासी नसून अशाच प्रकारे पत्ते बदलत तो एका ठिकाणी आढळून आलेला होता. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव आल्याने तूर्तास त्याचे पासून धोका नाही. त्यामुळे नाशिककरांनी घाबरून जायचे कारण नाही..
तरीही रुग्णांवर काटेकोरपणे पाळत ठेवण्याच्या सोबतच रुग्णालयातील व्यवस्थापन प्रभावी करणेबाबत सूचना करण्यात आल्या आहे. असे प्रकार यापुढे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध अत्यंत गंभीर कारवाई करण्यात येईल असेही वरिष्ठांनी सांगितले आहे..!