नाशिक: बनावट ॲपल ॲक्सेसरीजप्रकरणी एमजी रोडच्या दुकानांवर छापेमारी

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील महात्मा गांधी रोडवरील (एमजी रोड) मोबाईल ॲक्सेसरीज मार्केटमधील पाच दुकानांवर पोलिसांनी छापामारी करीत ॲपल कंपनीचे पावणे पाच लाखांच्या बनावट ॲक्सेसरीज जप्त केला.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात चौघांविरोधात कॉपीराईट ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विपिन चिमणाजी पटेल (४३, रा. उदय कॉलनी, पंचवटी), बाबुलम नेथिराम चौधरी (२७, रा. उदय कॉलनी, पंचवटी), सुरेश भोपाजी देवास (२२, रा. दीपज्योती अपार्टमेंट, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी), रमेश मगा प्रजापती (३२, रा. मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

ॲपल कंपनीचे प्रतिनिधी कुंदन गुलाबराव बेलोशे (रा. विठ्ठलवाडी, पूर्व कल्याण, ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, एमजी रोड परिसरातील मोबाईल मार्केटमध्ये ॲपल कंपनीचे बनावट ॲक्सेसरीज विक्री केली जात होती.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

त्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होत होता. याबाबत खातरजमा केल्यानंतर शहर गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी (ता. १९) दुपारी दोन वाजता पाच दुकानांवर छापा टाकला.

यात ॲपल इंक कंपनीच्या बनावट ॲडाप्टर, युएसबी केबल, एअरपॉड, मोबाईल बॅककव्हर, ॲपल स्टीकर यासह साहित्य असे ४ लाख ६३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात कंपनीच्या स्वामीत्व हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरवाडे हे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790