Breaking News: नाशिकच्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांबाबत झाला हा मोठा निर्णय

Breaking News: नाशिकच्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांबाबत झाला हा मोठा निर्णय

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि. ६ जानेवारी) बैठक घेतली.

हे ही वाचा:  नाशिक: यशवंत मंडईतील गाळे खाली न करणाऱ्यांचे वीज, पाणी कापणार

कोरोनाचा हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील पहिली ते नववीचे वर्ग ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.६) दुपारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील अन्य शहरांमध्येदेखील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. दहावी आणि बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरु राहतील. ते म्हणाले सर्व सरकारी, निम सरकारी कार्यालय, हॉटेल्स, मॉल्स, आणि बाजारपेठांमध्ये नो वाक्सीन नो एन्ट्री चा नियम कठोर करण्यात आला आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी असेल त्यांनी तो ताबडतोब घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking: देवळाली कॅम्पच्या लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया मेजरला अटक!
नाशिक: श्री सप्तशृंगी माता दर्शनाबाबत अतिशय महत्वाची बातमी
नाशिक शहरात तीन ठिकाणी घरफोडी; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group