Breaking: नाशिक शहरातील पोलिस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या !

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Breaking: नाशिक शहरातील पोलिस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या !

नाशिक (प्रतिनिधी): पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील 10 पोलीस निरीक्षकांसह 1 महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. याबाबतचा आदेश आज सायंकाळी जारी केला आहे.

यामध्ये पंकज भालेराव यांची नियुक्ती उपनगर वरून सातपूर पोलीस ठाण्याला करण्यात आली आहे. अनिल शिंदे यांची नियुक्ती नाशिक रोड पोलीस ठाण्यावरून पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. युवराज पत्की यांची नियुक्ती अंबड पोलीस ठाण्यातून मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे निर्बंध जारी!

गणेश न्याहदे यांची बदली नाशिक रोड पोलीस ठाण्यावरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सुरज बिजली यांची सायबर पोलीस ठाण्यावरून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे. देविदास वांजळे यांची बदली इंदिरानगर पोलीस ठाण्यावरून नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.

नाशिक: केकचे पैसे मागितल्याचा राग; बेकरी चालकावर धारदार शस्त्राने वार

पवन चौधरी यांची बदली अभियोग कक्षा करून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावर करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

नाशिक: अंगावरची हळदही अजून फिटली नव्हती अन् विवाहाच्या चौथ्या दिवशी तिने घेतला अखेरचा श्वास

पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांची नियुक्ती आर्थिक गुन्हे शाखेतून चुंचाळे पोलीस चौकीला करण्यात आलेली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक अपेक्षा जाधव यांची बदली नियंत्रण कक्षातून चुंचाळे पोलीस चौकीला करण्यात आली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे यांची बदली सायबर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. संजय बांबळे यांची बदली इंदिरानगर पोलीस ठाण्यातून विशेष शाखेमध्ये करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल; फक्त इतके दिवस आधी करता येणार बुकिंग

चुंचाळे पोलीस चौकीला मिळाला पोलीस निरीक्षक:
सातत्याने अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्याचे विभाजन करून स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे अशी मागणी केली जात होती. याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या देखील केला जात होत्या. परंतु या बदलांच्या प्रशासकीय कारणांमध्ये चुंचाळे पोलीस चौकीसाठी प्रथमच स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक देण्यात आले आहे. या माध्यमातून भविष्यामध्ये चुंचाळे हे नवीन पोलीस स्टेशन होऊ शकते असे चर्चिले जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790