Breaking: सोमेश्वरच्या धबधब्यात पोहण्यासाठी आलेले दोघे मित्र बुडाले; शोध मोहीम सुरु

Breaking: सोमेश्वरच्या धबधब्यात पोहण्यासाठी आलेले दोघे मित्र बुडाले; शोध मोहीम सुरु

नाशिक (प्रतिनिधी): म्हसरूळला ११ वर्षीय बालकाचा खेळत असतांना पडीक विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच अजून एक घटना घन्गापूर रोडला घडली आहे.

गंगापूररोडवरील सोमेश्वर धबधबा पाहण्यासाठी गेलेले दोघे मित्र गोदावरी नदीपात्रात बुडाले आहेत.

आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 'या' सराफ व्यावसायिकाकडे 26 कोटी रुपये रोख अन् 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त!

माहिती मिळताच नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

गंगापूर धरणातून गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीत ६०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे सोमेश्वर धबधबा खळाळतो आहे. सध्या कडाक्याचे ऊन असल्याने शीतलता मिळण्यासाठी आणि पोहण्यासाठी अनेक जण सोमेश्वर धबधब्याच्या ठिकाणी येत आहेत.

हे ही वाचा:  नाशिकरोड परिसरात एकाच दिवशी तीन घरफोड्या; सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10475,10473,10479″]

आज दुपारच्या सुमारास ४ मित्र सोमेश्वर धबधब्याच्या ठिकाणी आले. ते पोहणे आणि आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले. मात्र, त्याचवेळी वाहत्या पाण्याचा आणि नदीपात्राच्या खोलीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे यातील दोन जण बुडाले. अन्य दोघांनी आरडाओरडा केल्याने तेथे उपस्थित असलेल्यांनी मदतीसाठी प्रयत्न केले. त्याचवेळी काही जणांनी मनपा अग्निशमन विभागाला तसेच पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या दोघांना शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group