Breaking: वणी-सापुतारा मार्गावर भीषण अपघात; तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Breaking: वणी-सापुतारा मार्गावर भीषण अपघात; तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी – सापुतारा रस्त्यावर आज झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात दोन तरुणीसह एका युवकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

मागील काही दिवसांपासून नाशिकमधील अपघाताच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. भरधाव वेग व वाहतूक नियमांचे उल्लंघन हे अपघातामागील मुख्य कारण असते.

नाशिक जिल्ह्यातील वणी-सापुतारा मार्गावर काल (मंगळवारी) सायंकाळच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन तरुणीसह एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात १) अंजली राकेश सिंग, वय २३ वर्षे रा. सातपुर, नाशिक २) नोमान चौधरी वय २१ वर्षे रा. सातपुर अंबड लिंक रोड नाशिक ३) सृष्टी नरेश भगत वय २२ वर्षे रा. रामबाज स्क्वेअर नागपुर हे मयत झाले आहेत.तर अजय गौतम हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वणीकडून सापुताराकडे जाणाऱ्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चार मित्र-मैत्रिणी एका कारने वणीहून सापुताराकडे जात होते. त्यांची कार चौसाळे फाट्याच्यापुढे आली असताना, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. या भीषण अपघातात दोन तरुणीसह एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमीला तातडीने उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group