Breaking: नाशिक शहरातील दुहेरी खून खटल्यात रवी निकाळजेसह चार जणांना जन्मठेपेची शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): पूर्ववैमनस्य व जुने वादावरून तलवार व कोयत्याने हल्ला करुन दोन जणांचा खून केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. पी देसाई यांनी दिला. २७ डिसेंबर २०१७ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास राजीव नगर झोपडपट्टी लगत रवी गौतम निकाळजे, दीपक दत्ता व्हावळ, कृष्णा दादाराम शिंदे, नितीन उत्तम पंडित, आकाश उर्फ बबलू डंबाळे यांनी दिनेश निळकंठ मिराजदार (२२) देविदास वसंत ईघे (२२) यांच्यावर हल्ला केला होता.

हे ही वाचा:  नाशिक: काझी गढीवरील 3 घरे कोसळली! चौथ्या घरास तडा; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान

त्यात या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या चारही हल्लेखोरांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

सदर प्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे या आरोपी विरुध्द रिक्षा चालक रमेश भीमराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याची सुनावणी न्यायालयात जुलै २०१८ पासून सुरू होती. सदर खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज बघून एकूण १९ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.

हे ही वाचा:  नाशिक: गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत बदल

या खटल्यात त्तीन साक्षीदारांचा जबाब, मयताच्या शरीरावरील जखमा, शवविच्छेदन अहवाल, रासायनिक विश्लेषणचा अहवाल हे महत्त्वाचे पुरावे ठरले. या सर्व पुराव्यावरुन न्यायालयाने पाचही आरोपींना मृत्यूप्रकरणी जबाबदार धरले.

बेकायदेशीरपणे गैर कायद्याची मंडळी जमवून आरोपींनी सदरचे क्रुर कृत्य भरस्त्यावर केल्याचे सिध्द झाल्यामुळे न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंड ठोठावला. शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींनी न्यायालयात आरडा ओरडा केला. परंतु न्यायालयात हजर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त बजावल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सदर निकाल ऐकण्यासाठी जिल्हा न्यायालय आवारात नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती.

हे ही वाचा:  राज्यात चार दिवस मध्यम पावसाची शक्यता !

सदर खटल्याच्या सुनावणीकडे व निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. अशा प्रकारे तरुण पिढीच्या हातून अविचाराने घडणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा बसणे आवश्यक आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या इसमावर सदर निकाल एक प्रतिबंधात्मक कारवाई ठरेल असे मत जिल्हा सरकारी होतील अजय मिसर यांनी व्यक्त केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790