Breaking: नाशिक मुंबई महामार्गावरील भीषण अपघातात ३ शिक्षक ठार; २ गंभीर जखमी
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याजवळील मुंढेगाव जवळ नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला आहे.
हा कंटेनर मुंबईकडून नाशिककडे येणाऱ्या कारवर जाऊन धडकला.
या कारमध्ये जिल्हा परिषद शाळांचे 5 शिक्षक आणि एक शिक्षिका असल्याचे समजते.
दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास झालेल्या ह्या अपघातात दोन शिक्षक आणि एक शिक्षिका जागीच ठार झाले आहेत तर 2 शिक्षिका गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताची माहिती समजताच रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाली. अपघातातील दोन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान ह्या अपघातामुळे मुंढेगावजवळ मुंबईकडून येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9635,9626,9620″]
सदर शिक्षक दररोज नाशिक-इगतपुरी अप डाऊन करायचे. हे शिक्षक इगतपुरी तालुक्यातील समनेरे, धोंगडे वाडी, मालुंजे, मालुंजे वाडी या शाळेतील आहेत. शाळा सुटल्यानंतर ते नाशिककडे कारने (MH15-CM7532) येण्यासाठी निघाले होते. मुंढेगावाच्या बाहेर महामार्गावर येताना कंटेनर अचानक विरुद्ध दिशेला येऊन पलटी झाल्याने हा अपघात झालाय.
या अपघातात धनंजय कापडणीस (शाळा समनेरे), किशोर पवार (शाळा धोंगडे वाडी), ज्योत्स्ना टील्लू (शाळा मालुंजे) यांचा मृत्यू झाला असून, दोन शिक्षिका ह्या जखमी आहेत. दोनही जखमी शिक्षकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत