Breaking: नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सिनेस्टाईल पद्धतीने आठ लाखांची लूट

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Breaking: नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सिनेस्टाईल पद्धतीने आठ लाखांचा ऐवज लुटला

नाशिक (प्रतिनिधी): अगदी चित्रपटाला शोभेल अशी जबरी चोरी येवला तालुक्यातील जळगाव नेऊर ते अंगणगाव दरम्यान घडली आहे.

नासिर मोहम्मद शरीफ खान हा ट्रक चालक नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या जळगाव नेऊर येथे एचपी पेट्रोलपंपासमोर मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास आराम करण्यासाठी उभा असताना दुसऱ्या एका ट्रक मधून आलेल्या चौघा चोरट्यांनी नासिर खान आराम करत असलेला ट्रकचा ताबा घेऊन नासिरला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

हे ही वाचा:  नाशिक शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच; दोन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

हा ट्रक मुद्देमालासह सिनेस्टाईल पद्धतीने येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या अंगणगाव येथील पद्मकुंज सोसायटीपर्यंत आणला.

यानंतर हा ट्रक निर्जन ठिकाणी नेऊन या ट्रक मधील 68 टायर, 68 ट्यूब नायलॉन फ्लप, 2 मोबाईल असा एकूण 8 लाख 812 रुपये किमतीचा मुद्देमाल आपल्या ट्रकमध्ये काढून घेत घटनास्थळावरून पोबारा केला.

हे ही वाचा:  २ महिन्यांच्या मुलीची ५ लाखांत विक्री; नाशिकमधील आईसह ९ जणांना अटक !

नाशिकमध्ये जॉब शोधताय ? इथे क्लिक करा !

या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजतात पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून चौघा चोरट्यांचा शोध सुरू केला. या घटनेमुळे मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे हे करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group