नाशिकमध्ये अदानी समूहाची गुंतवणूक, अदानी ट्रान्समिशन करणार वीज पुरवठा
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराला भेडसावणारी विजेची समस्या दूर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. देशातील सर्वात मोठा समूह असलेल्या अदानी ट्रान्समिशनने नाशिक परिसरात वितरण व्यवसायासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड ही शाखा सुरु केली आहे.
त्यामुळे आगामी काळात नाशिक शहरात बत्ती गुल होण्याचा प्रश्न मिटणार आहे.
नाशिक शहराची लोकसंख्या वाढत असून त्यामुळे विजेचा वापर देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच महावितरणच्या जोडीला आता अदानी समूह नाशिकमध्ये वीज वितरण करणार आहे. येत्या काळात अदानी ट्रान्स्मिशनकडून नाशिक शहराला वीजपुरवठा करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अदानी समूहाने चाचपणी केली आहे.
शिवाय अदानी ट्रान्समिशनची एक शाखा देखील शहरात खुली करण्यात आल्याचे समजते आहे. याबाबत माहिती बिजनेस स्टँडर्ड्स या वाहिनीने दिली आहे. त्यामुळे नाशिक शहराला विजेची कमतरता आता भासणार नसल्याचे चित्र आहे.
नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
दरम्यान देशातील दिग्गज अदानी समूह लवकरच नाशिक शहराला वीज पुरवठा करणार आहे. याबाबतची माहिती अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीनेच दिली आहे. सद्यस्थितीत नाशिक शहरामध्ये केवळ महावितरण कंपनीचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे आगामी काळात अदानी समूहाकडून वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.
- नाशिकसह जिल्ह्यात चौथ्या दिवशी अवकाळीसह गारपीट, शेतीपिकांत गारांचा खच
- नाशिक शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण ठार
- नाशिक: पंचवटीत काकाचा पुतण्यावर चाकू हल्ला, पुतण्या गंभीर जखमी
त्यामुळे नाशकात प्रथमच खासगी वीज व्यावसायिक पुरवठा सेवेत उतरणार आहे. अदानी ट्रान्समिशनने नाशिक परिसरात वितरण व्यवसायासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड ही शाखा सुरु केली आहे. नाशिक शहरात समांतर वितरण परवाना लागू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने 16 मार्च 2023 रोजी ‘अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड’ नावाने संपूर्ण मालकीची उपकंपनी सुरु केली आहे.
नाशिकची टोईंग झाली बंद, आता थेट ई-चलानद्वारे दंड वसुली
महावितरण कंपनी प्रचंड तोट्यात, मात्र… :
अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड या कंपनीची गुजरातमधील अहमदाबाद येथे 16 मार्च रोजी नोंदणी करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेडने अधिकृत कामकाज सुरु केलेलं नाही. अदानींच्या कंपनीने वीज पुरवठा सुरू केला तर नाशिक शहरात महावितरण आणि अदानी असे दोन पुरवठादार राहणार की फक्त अदानीला परवानगी दिली जाणार याबाबत काहीही स्पष्टता झालेली नाही. मात्र शहर परिसरात एकाचवेळी दोन पुरवठादार असले तर वीज पुरवठ्याच्या क्षेत्रात स्पर्धा निर्माण होईल. यातून ग्राहकाला दर्जेदार सेवा आणि किंमतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मुंबईमध्ये टाटा, अदानी, रिलायन्स यांच्या माध्यमातून वीज पुरवठा होत आहे. अशाच पद्धतीने आता राज्यातील विविध शहरांमध्ये वीज पुरवठ्याची सेवा देण्याचा सरकारचा मानस असल्याचे बोलले जाते.