Breaking: कसारा घाटात 4 वाहनांचा विचित्र अपघात ; 2 जण ठार,1 जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात सोमवार ( ता.५ रोजी ) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

यात आयशर, छोटा हत्ती व दोन पिकअप यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले.

या भीषण अपघातात इस्तकार इजहर खान ( वय 25 ) मुस्तपा खान ( वय 35 ) यांचा मृत्यु झाला आहे.

तर वजीर खान हा जखमी झाला आहे.अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असुन जखमीला पुढील उपचारासाठी जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या रुग्णवाहिके द्वारे इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

तर दोन्ही पिकअप मधील शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडुन रस्त्यावर पडल्या.

कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम घटनस्थळी दाखल झाली असुन अपघातग्रस्त वाहने बाजूला टोल क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

रस्त्यावर कोंबड्यांचा खच
दरम्यान कसारा घाटात रात्रीच्या सुमारास अपघात अधिक होत असल्याचे चित्र आहे. यावेळी आयशर, छोटा हत्ती आणि दोन पिक अप यांच्यात हा विचित्र अपघात झाला. दोन्ही पिकअप गाड्यांमधील कोंबड्या मृत्युमुखी पडून रस्त्यावर पडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर कोंबड्याच कोंबड्या दिसून येत आहेत. कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस, रुट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहने टोल क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. इस्तकार इजहर खान, मुस्तफा खान अशी मयतांची मयत नावे असून वजीर खान हे जखमी व्यक्तीचे नावे आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group