प्रतिनिधी (नाशिक) : काल (दि.०१) पासून अन्न व औषध विभागाने खुल्या मिठाईवर ‘बेस्ट बिफोर’ तारीख प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. नाशिकमध्ये तीन-चार दुकानं वगळता अन्य कोणत्याच दुकानात ‘बेस्ट बिफोर’ चा उल्लेख केलेला नव्हता. म्हणून नागरिकांच्या आरोग्याला होणारे दुष्परिणाम लक्षात घेता यापुढे दुकानदारांना खुल्या मिठाई वर अंतिम तारीख लिहणे बंधनकारक केले आहे.
नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी अन्नविष बाधेच्या घटना याआधी घडल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी होण्याची दाट शक्यता आहे याची खबरदारी लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील प्रमुख उत्पादकांची बैठक घेतली. यामध्ये बेस्ट बिफोर तारखेची सक्ती केली आहे. अन्न व औषध विभागाने यावर निर्बंध लादले आहेत मात्र दुकानदारांनी त्याबात कुठलेही गांभीर्य लक्षात घेतांना दिसून येत नाहीये. लोकांना गुणवत्तापूर्ण मिठाई मिळण्यासाठी हा नियम लागू केला आहे. प्रारंभी याबाबत जनजागृती केली जाईल त्यानंतर मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गणेश परळीकर यांनी सांगितले.