नाशिक (प्रतिनिधी): कस्टम आधिकारी असल्याचे सांगत एकाने ४० हजाराला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणूक प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील धंदरफळ येथील नामदेव बबन गुंजाळ (५७) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवारी दुपारी चारला मुंबई नाका पोलिस ठाण्या समोरील राज्य परिवहन महामंडळाच्या महामार्ग बसस्थानकात कस्टम आधिकारी असल्याचे सांगून माझी झडती घेतली. त्यानंतर हात चलाखीने त्यांच्याकडील ४० हजाराचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पत्की तपास करीत आहेत.
अज्ञानाचा फायदा घेऊन ही फसवणूक करण्यात आली आहे. बस स्टॅण्डवर कस्टम अधिकारी म्हणून गंडा घालणार हा भामटा मात्र निराळाच आहे. आतापर्यंत पोलिस अधिकारी सांगत फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहे. पण, कस्टम अधिकारी सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे.