नाशिक(प्रतिनिधी): शहरात रविवारी (दि. २४ मे २०२०) आढळून आलेल्या रुग्णांची हिस्ट्री आपण जाणून घेऊ या..
पंचवटी: हॉटेल व्यवसायिक यांचे मार्केट यार्ड येथे नियमित येणे-जाणे होते. शुक्रवार दिनांक २२ मे २०२० रोजी त्यांना त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असता त्याचे स्वाब घेण्यात आले तो अहवाल पॉझिटिव्ह आहे.
मुमताज नगर वडाळा येथील रुग्णाच्या संपर्कातील एकूण ५ व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून त्यातील १६ वर्षीय, ७६वर्षीय व ४२ वर्षीय पुरुषाचा तसेच १५ वर्षीय व १८ वर्षीय युवतीचा समावेश आहे.
संजीव नगर येथील मयत कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील ३ व्यक्तींचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा आला असून त्यात ८ वर्षीय व २ वर्षीय बालकाचा व १० वर्षीय बालिकेचा समावेश आहे.
विसे मळा (कॉलेज रोड) येथील रहिवाशी मालेगाव पोलीस यांच्या कुटुंबातील १७ वर्षीय व २३ वर्षीय युवती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
महाराणा प्रताप चौक सिडको येथील रुग्णाच्या कुटुंबातील ३ महिला व १ वयोवृद्ध व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
परदेशातून नाशिक शहरात आलेले २४ नागरिकांना हॉटेल सेव्हन हेवन मध्ये ठेवण्यात आले होते त्यासर्वांचे स्वाब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ८ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत. या ८ ही जणांना होम कोरंन टाईन करून घरी सोडण्यात आले आहे
गोविंद नगर येथील रहिवासी हे स्वतः डॉक्टर म्हणून मालेगाव येथे ७ दिवस कार्यरत होते ते मालेगावहुन आल्यानंतर त्यांचे दिनांक २० मे २०२० रोजी स्वाब घेण्यात आले त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो अहवाल पॉझिटिव्ह असून गोविंद नगर राहते घराची इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.
विसे मळा येथील रहिवाशी मालेगाव येथील पोलिस कर्मचारी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांचे राहते घर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.