उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले …

राष्ट्रवादीने सरकारसोबत निर्णय घेतला आहे . वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील नऊ वर्षात कारभार चालला आहे तसा चांगला प्रयत्न मोदी करत आहे. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवून आम्ही  निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री  झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सत्तेत राष्ट्रवादी पक्ष म्हणून सहभागी : अजित पवार
अजित पवार म्हणाले, देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे, मी वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा प्रयत्न माझा राहणार आहे. कोरोना होता तरी विकास ही आमची भूमिका होती.  केंद्रीय निधी राज्याला कसा मिळेल यासंदर्भात पुढाकार घेणार आहे. हा निर्णय आमदारांना हा निर्णय मान्य आहे. आम्ही सत्तेत राष्ट्रवादी पक्ष म्हणून सहभागी होत असून  पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार  आहे.

एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस संपलेले आहेत : अजित पवार
राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात आम्ही भाजपबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहोत. एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस संपलेले आहेत. आमच्याकडे सर्व आकडा आहे. पार्टी आमच्याबरोबर आहे .वरिष्ठांना देखील आम्ही सांगितलंय. मागील 24 वर्षात अनेक निर्णय घेतले आहेत, डोक्यावरुन अनेक पाणी वाहून गेलं आहे. नवं नेतृत्व देखील पुढे आलेलं आहे  सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्याचं काम करु.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790