नाशिक: … आणि चक्क वीस वर्षांनंतर युवकाला ऐकू यायला लागलं !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

अपोलो हॉस्पिटल नाशिकमध्ये प्रथमच कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !

नाशिक (प्रतिनिधी): 32 वर्षीय जळगाव स्थित युवक अमित (नाव बदललेले आहे) रुग्णाला व्हायरल तापामुळे वीस वर्षांपासून ऐकू येणे पूर्णपणे बंद झाले होते. गेल्या वीस वर्षांपासून सदर रुग्ण आणि त्याचे नातेवाईक महाराष्ट्रात बहिरेपणावर काही उपचार करून त्याला ऐकू येईल का? याचा प्रयत्न करत होते आणि अनेक डॉक्टरांना भेटत होते.

त्यांना नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलबद्दल माहिती मिळाली आणि कान, नाक आणि घसा तज्ञ डॉ. निरज पाटील यांच्याकडे मार्गदर्शन व तपासणी करिता ते रुग्णाला घेऊन आले. डॉ. पाटील यांनी रुग्णाच्या आवश्यक असणाऱ्या कानाच्या तपासण्या केल्या आणि पूर्ण बहिरेपणावरती कॉकलेअर इम्प्लांट या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि खर्चिक असलेल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती आणि सल्ला दिला. खर्च जरी जास्त असला तरीदेखील रुग्णाला ऐकू येईल या उद्देशाने रुग्णाच्या नातेवाईकांनी देखील शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

सदर शस्त्रक्रिया करण्याकरिता भारतातील प्रसिद्ध कान, नाक आणि घसा तज्ञ डॉ. राजेश विश्वकर्मा, जे अपोलो हॉस्पिटल्स अहमदाबाद येथे कार्यरत आहेत यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांनी देखील होकार देत रुग्णाला शस्त्रक्रियेची तारीख दिली, साधारण दोन तास चाललेल्या अत्यंत गुंतागुंतीचे शस्त्रक्रियेत कान नाक आणि घसा तज्ञ डॉ. राजेश विश्वकर्मा, डॉ. नीरज पाटील आणि भुलतज्ञ डॉ. भूपेश पराते आणि ऑडिओमेट्रिस्ट गणेश सूर्यवंशी हे सहभागी होते.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात महावितरणचे छापे; वीज चोरीचे गुन्हे दाखल !

शस्त्रक्रिया झाल्यावर लगेचच ऑपरेशन थेटरमध्ये नर्व्ह कंडक्शन तपासणी करण्यात आली आणि सदर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाला व्यवस्थित ऐकू येत आहे हे लक्षात आले.

भारतातील प्रसिद्ध कान, नाक आणि घसा तज्ञ तसेच अपोलो हॉस्पिटल अहमदाबाद येथील कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ.राजेश विश्वकर्मा म्हणाले, “संपूर्ण बहिरेपणावर भारतातील मोठ्या शहरांबरोबरच नाशिकमध्ये देखील उपचार आणि शस्त्रक्रिया करणे शक्य आहे, या विकसित तंत्रज्ञानामुळे रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे, बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांनी घाबरून न जाता कॉकलेर  इमप्लांट बसवून बहिरेपणावर मात करून त्यांना व्यवस्थित ऐकू येऊ शकते”

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा म्हणाले की, “अत्यंत प्रगत तसेच गुंतागुंतीची कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया अपोलो हॉस्पिटल्स नाशिक मध्ये उपलब्ध आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना हि शस्रक्रिया करण्यासाठी मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्राबाहेरील मोठ्या शहरात गेल्यास अधिक खर्च येऊ शकतो. त्यामुळे नाशिकमध्येच जर आपण सदर शस्रक्रिया केली तर खर्च देखील कमी येतो. प्रसिद्ध कान,नाक आणि घास तज्ञ डॉ. राजेश विश्वकर्मा , डॉ.नीरज पाटील आणि भूलतज्ञ डॉ.भूपेश पराते यांचे  कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी केल्या बद्दल अभिनंदन करतो.”

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790