नाशिक रोड परिसरात घरफोडी; लाखो रुपयांचा ऐवज लंपास…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथील जेलरोड परिसरात भरदिवसा घरफोडी करण्यात आली आहे.
जेलरोड परिसरात असलेल्या दसक परिसरात एका बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून ही साहसी चोरी करण्यात आली आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कृष्णा दत्तात्रय आढाव हे आढाव पेट्रोल पंपाजवळील श्रीकृष्ण नगर मधील माऊली पार्क मध्ये फ्लॅट नंबर 9 येथे राहतात. 31 जानेवारी रोजी आढाव हे परिवारा सोबत घर बंद करून बाहेर गेले होते. संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराला लावलेल कुलूप तोडलेल दिसलं. याच दरम्यान अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करत घरातील सामान अस्ताव्यस्त केलं होतं. घरातील कपाटातील रोख रक्कम चोरांनी काढून घेतली होती. कपाटातील सामान सुद्धा खाली पडलेलं होतं.
- नाशिक: सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला आग; लाखो रुपयांचे नुकसान
- पती ठरत होता प्रेमप्रकरणात अडथळा; पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन केला पतीचा खून
- सरकारी सौरपंपाचे आमीष; बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करणारा अटकेत
घरात बघितले असता चोरांनी घरातील आठ लाख पंचवीस हजाराची रोकड लंपास केली होती. यात घरातील मंदिराच्या दानपेटीतील पंचवीस हजार रुपयांची रक्कम तसेच बेडरूममधील 10, 20, 50, 100, 500 रुपयांच्या नोटाचा समावेश आहे.
आढाव यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्याच पथक घटना स्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरां विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दिवसा झालेल्या चारोनी परिसरातील नागरिक भयभीत झाले असून शहरात पोलिसांचा वचक राहिला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.