Live Updates: Operation Sindoor

गंगापूर रोड: वाईन शॉप फोडून जवळपास लाखो रुपयांचे मद्य चोरीस !

गंगापूर रोड: वाईन शॉप फोडून जवळपास लाखो रुपयांचे मद्य चोरीस !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेले दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले आहे.

या दुकानातून चोरट्यानी गल्यातील 13500 रुपयांची रोकडसह मद्याच्या बाटल्या असा एकूण 98 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, गंगापूर रोडवरील स्टर्लिंग अपार्टमेंटमध्ये गाळे आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: केटीएचएम कॉलेज येथे आज (दि. ७ मे) झालेल्या मॉक ड्रिलची क्षणचित्रे…

यातील गाळा नंबर चार पाच व सहा येथे समाधान वाईन शॉप हे दारूचे दुकान आहे. दुकानाचे व्यवस्थापक साळी असून शनिवारी रात्री दुकान बंद करून घरी गेल्या नंतर (30 जानेवारी) च्या मध्यरात्री ही घटना घडली. रस्त्यावर शुकशुकाट असताना चोरट्यांनी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास सेफ्टी साठी असलेले ग्रील तोडले. त्यानंतर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यात असलेले तेरा हजार पाचशे रुपये काढण्यात आले यानंतर दुकानात असलेल्या वाईन तसेच दारू पाहण्यास सुरवात केली.

👉 हे ही वाचा:  यंदा मान्सूनचे लवकर आगमन – १३ मेपूर्वी अंदमानात प्रवेश, महाराष्ट्रातही लवकर हजेरीची शक्यता

प्रत्येक दारूची बॉटल बघून या चोरट्यानी महागड्या दारूच्या बॉटल काढल्या या सर्व बॉटल आणि रोख रक्कम अशी एकूण 98 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या महागड्या दारू मध्ये जॉनी वोकर,  जॉनी वोकर गोल्ड लेबल, लो लँड, स्पेस साईट, सिंगल टर्न, आर्ट बर्ग, कावा लँड, ग्लेन मोरंजी लसंटा यांच्या 85 हजाराची महागडी दारूच्या बॉटल आणि 13500 रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक एस एस भिसे तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790