‘या’ महाविद्यालयातील आणखी 10 मुलींचे स्वॅब पॉझिटिव्ह
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील तब्बल २७ विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सोमवारी नव्याने दहा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.
सद्य स्थितीत शहरात ६९२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यात महापालिका हद्दीतील ४३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी (ता. २) पंचवटीतील कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात १७ विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती.
वैद्यकीय विभागाने वसतीगृहातील ८४ मुलींसह कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले. सोमवारी (ता. ३) १० मुलींचे अहवाल वैद्यकीय विभागाला प्राप्त झाले त्यात सर्व अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांचा आकडा २७ पर्यंत पोहोचला आहे. वसतीगृहातील मुलांचेही स्वॅब घेतले जात आहे. वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचे देखील स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजिता साळुखें यांनी दिली आहे. सोमवारी रात्रीपर्यंत सर्व अहवाल प्राप्त होतील.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: धक्कादायक; १६ वर्षाच्या मुलाला कोव्हॅक्सिन ऐवजी दिली कोव्हीशील्डची लस आणि मग…
“लग्न करत नाही तर शारिरीक सबंध ठेव” लग्नासाठी युवतीवर दबाव;तरुणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा