नाशिक: थर्टी फर्स्टचे स्वागत करतांना नाशिकमध्ये हवेत गोळीबार

नाशिक: थर्टी फर्स्टचे स्वागत करतांना नाशिकमध्ये हवेत गोळीबार

नाशिक (प्रतिनिधी): नव वर्षाचे स्वागत करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे.

मुदतबाह्य झालेल्या बारा बोर बंदुकीतून हवेत गोळीबार केल्यानं विलास विजय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरात घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बंदूक व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तर संशयित आरोपी विरोधात इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नाशिकच्या इंदिरानगर मधील गामणे मैदाना समोर शुक्रवारी रात्री नव वरश्याचे स्वागत करण्यासाठी परिसरातील काही नागरिक जमले होते. रात्री पावणे बाराच्या दरम्यान थर्टी फर्स्ट साजरा करताना संशयित विलास विजय (वय 47 वर्ष शिवालिक स्काय आपारमेंट गामणे मळा) याच्या कडे 12 बोर बंदूक आहे. या बंदुकीच्या परवान्याची मुदत संपलेली आहे. मात्र रात्री पावणे बारा वाजेच्या दरम्यान  थर्टी फस्ट साजरा करण्याच्या जल्लोषात संशयिताकडून गोळी झाडली गेली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9596,9594,9583″]

गोळीच्या आवाजाने या परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांना माहिती कळताच पोलिसांकडून  तात्काळ कारवाई करण्यात आली. संशयितांवर भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम (3) (25) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून 12 बोर बंदूक आणि चार जिवंत काडतुसे व एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे.  पोलीस उपनिरीक्षक उघडे याबाबत अधिक तपास करीत आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here