जुने, नवीन सिडकोतील रहिवाशांची गैरसोर दूर होणार
नाशिक (प्रतिनिधी): कर्मयोगीनगर येथील ब्लू बेल्स इमारतीकडे जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्याच्या कामाला महापालिकेने मंजुरी दिली आहे.
या कामासाठी ३९ लाख ९९ हजार रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.
तिडकेनगर, कर्मयोगीनगर येथील नाल्यावर ब्लू बेल्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधावा, अशी मागणी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, महिला आघाडी शाखा संघटक धवल खैरनार, उपशाखा संघटक संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. आज शुक्रवार, दि. १७ डिसेंबर रोजी वृत्तपत्रांमध्ये निविदाही प्रसिद्ध झाली आहे. हा पूल झाल्यास पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक, कालिका पार्क, तिडकेनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर, उंटवाडी या परिसरातील आणि बडदेनगर, जुने सिडको, शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक भागातील रहिवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
या कामाला मंजुरी दिल्याबद्दल शिवसैनिक, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, दिलीप दिवाणे, श्याम अमृतकर, नीलेश ठाकुर, शैलेश महाजन, श्रीकांत नाईक, मनोज वाणी, राहुल पाटील, राम भंडारे, मयूर ढोमणे, विनोद पोळ, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, वंदना पाटील, साधना कुवर, कांचन महाजन, माया पुजारी, पल्लवी रनाळकर, सरीता पाटील, सुनीता उबाळे, ज्योत्स्ना पाटील, संगिता नाफडे, रेखा भालेराव, संध्या बोराडे, स्वाती वाणी, दीपिता काळे, दिपाली सोनजे, संगिता चोपडे, नीलिमा चौधरी, मीना टकले, साधना पाटील, उज्ज्वला सोनजे, मीनाक्षी पाटील, रुपाली मुसळे, सचिन राणे, यशवंत जाधव, विजय कांडेकर, मगन तलवार, तुषार मोरे, वैभव कुलकर्णी, बापू आहेर, नितीन तिडके, आनंदा तिडके, गोपाळ तिडके, आशुतोष तिडके, बापू महाले, परेश येवले, राहुल काळे, मनोज पाटील, पुरुषोत्तम शिरोडे, मकरंद पुरेकर, मनोज कोळपकर, दीपक ढासे, समीर सोनार, मोहन पाटील, बाळासाहेब तिडके, प्रथमेश पाटील, संकेत गायकवाड (देशमुख) आदींनी महापालिका आयुक्तांचे आभार मानले आहे.