हृदयद्रावक: नाशिकला वडिलांच्या निधनानंतर एकुलत्या एक मुलाची आत्महत्या

नाशिक: वडिलांच्या निधनानंतर एकुलत्या एक मुलाची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१३) सकाळी ८ वाजेदरम्यान घडली.

तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यापासून तो तणावाखाली होता.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आर्य मिलिंद क्षत्रिय (वय १९, रा. गोविंद हाईट्स, गोविंदनगर, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यातून तो ताणतणावाखाली असायचा. त्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गोविंद हाईट्समध्ये तो आईसोबत राहत होता. सोमवारी सकाळी आईला सांगून तो घराबाहेर गेला. त्यानंतर त्याने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत आर्यला मृत घोषित केले.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: टोळक्याने केली तरुणाला मारहाण; धारदार शस्त्राने वार
BREAKING: डम्पर-कार अपघातात नाशिकचे डॉ. ज्ञानेश्वर महाजन ठार

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790