नाशिक (प्रतिनिधी): इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने मुख्याध्यापकांकडे मास्क दिले.
शहर आणि जिल्ह्यात सोमवारपासून इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या पहिल्याच दिवशी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख) यांनी पेठे विद्यालयाला भेट दिली. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांसाठी चारशे मास्क संस्थेचे सहकार्यवाह विजय मापारी सर, मुख्याध्यापिका उज्ज्वला कासार यांच्याकडे देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका अरुणा कोळपकर, डॉ. लक्ष्मी कस्तुरे, शोभा पाटील, सुनंदा साळुंके, नेहा बोडके, विद्या ठाकरे, मनीषा आहेर, बी. डी. आहेर आदी शिक्षक, तसेच शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, महिला आघाडी शाखाप्रमुख धवलताई खैरनार, प्रभाकर खैरनार, संजय टकले, अशोक पाटील, संग्राम देशमुख आदी हजर होते.
आकर्षक रांगोळ्या, पताकांची सजावट करून शाळेने विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत केले. याबद्दल शिक्षकांचे आभार मानण्यात आले. शाळेत कोरोनाचे नियम पाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याबाबत शिक्षकांनी पालकांमध्ये जागृती करावी, अशी विनंती यावेळी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांनी केली.