राज्यात साडे तीन वर्षाच्या मुलाला ओमिक्रॉनची लागण: मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांमध्ये चिंता !
नाशिक (प्रतिनिधी): ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरीएंट महाराष्ट्रात डोकं वर काढतोय.
आतापर्यंत या नविन व्हेरीएंटचे ५० पेक्षा जास्त रुग्ण देशात आढळून आले आहेत.
भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असतानाच ओमिक्रॉनने चिंता वाढवली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा ७ रुग्ण मिळून आले आहेत. यात गंभीर बाब म्हणजे राज्यात एका साडेतीन वर्षाच्या बालकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं वृत्त आहे.. महाराष्ट्रात १ डिसेंबर पासून पाहिली ते सातवीच्या शाळा सुरु होणार होत्या मात्र काही ठिकाणी रुग्ण संख्या जास्त असल्याने शाळा सुरु करण्यात आल्या.
तर काही ठिकाणी अपुरी व्यवस्था असल्याने उशिरा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारीच नाशिक महानगरपालिकेने १३ डिसेंबर पासून शहरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नवीन व्हेरीएंट ओमिक्रॉनचा धसका सर्वच पालकांनी घेतला आहे. ८० टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचं चित्र आहे.. त्यात राज्यात एका साडेतीन वर्षाच्या बालकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याने आता मुलांना शाळेत पाठवावे कि नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.
लस घेतली असतानासुद्धा काहींना कोरोनाची लागण झाली आहे. असे अनेक रुग्ण आहेत. लस घेतल्याने कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. त्यात लहान मुलांना शाळेत पाठवणे शक्य नसून मुलांची ऑनलाईन शाळा सुरु ठेवण्याची मागणी पालकांनी केली आहे. लहान मुलांना सुद्धा लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सुद्धा पालक करत आहेत.