हृदयद्रावक: कोरोना काळात काम गेलं.. नाशिकच्या इंजिनिअरची आत्महत्या…
नाशिक (प्रतिनिधी): कोरोना काळात काम गेलं आणि नैराश्याने ग्रासलं म्हणून नाशिकच्या एका इंजिनिअरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक शहरातील विक्टोरिया पुलावरून एका इंजिनियरने दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिलिंद भास्कर मराठे वय वर्ष 57, राहणार पारिजात नगर गंगापूर रोड नाशिक असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
सदर मिलिंद मराठे हे इंजिनिअर म्हणून एका कंपनीत काम करत होते. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे काम सुटल्याने मानसिक संतुलन बिघडून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तर नाशिक महानगरपालिकेने विक्टोरिया पूलावर सुरक्षा म्हणून थोडी उंच भिंत किंवा जाळी लावण्यात यावी या मुळे आत्महत्या टाळता येतील अशी मागणी नाशिककर करत आहेत. घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे एपीआय नेमाने, पोलीस नाईक धनराज पाटील, पोलीस नाईक अरुण चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला.
नाशिकची ही बातमीसुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिककरांनो इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे..