नाशिक: सोन्याचे पेंडल चोरताना चेन स्नॅचरने केले चार वर्षीय बालिकेवर ब्लेडने वार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराचा गुन्हेगारीचा आलेख हा वाढतच चालल्याच चित्र सध्या नजरेस पडतय. खून, घरफोडी, चेन स्नॅचिंग आदी घटना या भर दिवसा घडत असल्यामुळे नाशिक शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय.

तिकडे नाशिक पोलीस हेल्मेट सक्ती मध्ये व्यस्त असताना दुसरीकडे मात्र गुन्हेगारीनं चांगलेच डोकं वर काढलय. नाशिकच्या सिडको भागात दिवसेंदिवस छोट्या-मोठ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येतय.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: नरेश कारडा यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

पोलीस ठाणे हद्दीतील महाराणा प्रताप चौक भागात असलेल्या हनुमान चौक येथील विजय किराणा जवळ दुपारच्या सुमारास चार वर्षीय अवनी मयूर पगारे ही घराबाहेर खेळत असताना एका अज्ञात इसमानं तिच्या गळ्यातील एक ग्रॅम वजनाचे सोन्याचं ओम पान खेचून नेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी संबंधित इसमानं या मुलीच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले. झालेल्या दुखापतीमुळे अवनीनं आरडाओरड केल्यानंतर इसमानं सोनं तिथेच टाकून पळ काढला. या झटापटीत अवनीच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तिला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्यासाठी पीक स्पर्धा; 31 डिसेंबरपर्यंत अर्जाची संधी

सिडकोत अवघ्या चार वर्षाच्या मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलाय की नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. घडलेल्या या प्रकारावर पोलिस काय कारवाई करतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here