नाशिक (प्रतिनिधी): जुन्या भांडणातून रविवारी (दि.३१) दुपारी ३ वाजेदरम्यान दोन मित्रांनी एका युवकाची धारदार चाकूने हत्याची केल्याची धक्कादायक घटना एकलहरा रोड, मोहिते पार्क हॉटेलजवळ घडली आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रणजित उर्फ रिंकू हरभजन ग्राय (वय ३५, रा.अरिंगळे मळा, नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर उर्फ नान्या नारायण उमाप (वय २१, रा. नेहे मळा, ओढा रोड), शब्बीर मोहमद शेख (वय २५) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी अरिंगळे मळा, एकलहरा रोडवर रणजित ग्राय हे मित्रांसमवेत दारु पीत होते. दारु पीत असताना तिघांमध्ये जुन्या वादातून भांडण सुरु झाले. रणजित याने शब्बीर शेखच्या कानाखाली वाजवली. राग अनावर झाल्याने संशयितांनी रणजित याच्यावर चाकूने वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी अवस्थेत रणजित खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन संशयितांना हत्यारांसह ताब्यात घेतले.