महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या मार्गांवर आता वाहनांना प्रवेश बंद !

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या मार्गांवर आता वाहनांना प्रवेश बंद !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात दिवाळीसाठी झालेली खरेदीची गर्दी बघता काही मार्गांवर वाहनांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे.

नाशिक शहर पोलिसांनी याबाबत अधिसूचना जारी केल्या आहेत.

नाशिक शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मनपाकडून प्लॅस्टिकविरुद्ध कारवाई; ५८२ केसेस, २९ लाखांचा दंड !

त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबासुद्धा बघायला मिळत आहे. त्यामुळे नाशिक शहर पोलिसांनी या गर्दीच्या भागात वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. ही अधिसूचना २८ ऑक्टोबर २०२१ ते ७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत लागू राहील.

या मार्गांवर प्रवेश बंद:
मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजाकडे येणारी मालवाहू वाहने, दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंटपर्यंत येणारी वाहने, रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश गणेश मंदिर, भद्रकाली, बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, नेपाळी कॉर्नर ते मेनरोडमार्गे धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट मेनरोडकडे जाणारी वाहने आणि रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट.

हे ही वाचा:  नाशिक: नायलॉन मांजा विक्री करणारा संशयित ताब्यात

पर्यायी मार्ग:
मालेगाव स्टॅण्ड – मखमलाबाद नाका – रामवाडी – बायजाबाईची छावणी – चोपडा लॉन्स – गंगापूरनाका येथून इतरत्र जातील. जुन्या नाशकात जाण्या-येण्यासाठी शालिमार – गंजमाळ सिग्नल – दूधबाजार मार्गाचा वापर करतील.

हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळ्याच्या आराखड्यात स्थानिक गरजा लक्षात घ्या: मुख्य सचिव सुजाता सौनिक

पार्किंगची ठिकाणं:
गोदाघाट, गाडगे महाराज पुलाखाली, सांगल बँक सिग्नल, सागरमल मोदी विद्यालय आणि कालिदास कलामंदिरासमोर.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790