नाशिकच्या या भागात होतोय दुषित पाणी पुरवठा; नागरिक संतप्त
नाशिक (प्रतिनिधी): वडाळा गाव भागात नागरिकांना दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
या दूषित पाणी पुरवठयामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा गंभीर होण्याची शक्यता आहे.
ऐन सणासुदीच्या काळात नाशिकच्या वडाळा गाव परिसरात नागरिकांना अतिशय खराब आणि दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकानांनी तीव्र संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. वडाळा गावात आज (दि. १४ ऑक्टोबर) सकाळपासून प्रचंड मातीमिश्रित गढूळ पाणीपुरवठा झाला. या दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. खराब पाण्यामुळे पसरणाऱ्या आजाराचं देखील प्रमाण यामुळे वाढण्याची शक्यता आहे. शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून देखील वडाळा गावाची ओळख आहे. अतिशय खराब आणि पिण्यास योग्य नसलेला पाणीपुरवठा नळांना होत असल्यानं तीव्र संताप नागरिक व्यक्त करत आहेत.