नाशिककरांनो, श्री कालिका माता दर्शनाबाबत अजून एक अत्यंत महत्वाची बातमी…
जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिकच्या श्री कालिका माता मंदिराच्या गेट पासून सर्व बाजूने 100 मीटर इतक्या अंतरावर विना दर्शन पास, टोकन, अनधिकृत व्यक्ती किंवा स्टॉल धारक यांना फिरता येणार नसून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
राज्यातील सर्व मंदिरांपाठोपाठ नाशिक जिल्ह्यात देखील मंदिरे उघडल्याने भाविकांमध्ये एकच उत्साह बघायला मिळत आहे.
नाशिकची ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका माता मंदिर येथे भाविकांना ऑनलाइन पद्धतीने पास किंवा टोकन घेऊन दर्शन घेता येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलिस प्रशासन, महापालिका आणि कालिका माता मंदिर ट्रस्ट यांच्यात झालेल्या संयुक्तिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय दिनांक 07 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या नवरात्रोत्सव कालावधीत मंदिराच्या गेट पासून चारही बाजूने, 100 मिटर अंतरावर विना टोकन भाविक व कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस तसेच स्टॉल धारकास फिरता येणार नाहीये. अन्यथा त्यांच्यावर कलम 188 व कलम 134 प्रमाणे पोलिस कारवाई केली जाणार आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8542,8536,8533″]
एकीकडे देवी देवतांच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह मोठा आहे, त्यातच सर्वच भाविकांना इंटरनेटचे ज्ञान नसून ऑनलाईन पास, टोकन काढणे हे या भाविकांना शक्य होत नाही. त्यामुळे अशा भाविकांना श्री कालिका मातेचं दर्शन घेता येईल असं वाटत नाही. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजी आहे. असं असलं तरीही कोरोनाचं संकट हे मोठं असल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत..!