”..त्यानंतर आपण सर्वजण सोबतच राहू बेटा..” नाशिकच्या जवानाचा तो फोन ठरला अखेरचा..

”मी 30 ऑक्टोबरला सेवा निवृत्त होत आहे, त्यानंतर बेटा आपण सर्वजण सोबतच राहू”

नाशिक (प्रतिनिधी): मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील व सध्या अंबड गावानजीक असलेल्या कंफर्ट झोन सोसायटीतील रहिवासी गणेश सोनवणे हे सैन्यदलामध्ये आपल्या देशाची सेवा करीत होते.

मंगळवारी (ता.5 ) सैन्यदलाच्या कार्यालयातून त्यांच्या पत्नीला फोन आला की त्यांच्या पतीचा एका अपघातात मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या घटनेने संपूर्ण सोनवणे कुटुंबीय हादरले.

सोनवणे कुटुंबीयांचे दुर्दैव असे की गणेश सोनवणे यांचे दोन्ही बंधूचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. आणि काल ते देशसेवा करीत असतांना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबड येथील निवासस्थानी येणार असून त्यांचा अंत्यविधी अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे होणार आहे.

हे ही वाचा:  राज्यात ढगाळ वातावरणामुळे गारठा कमी, पण 'या' भागांत थंडीचा कडाका वाढणार

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8507,8497,8486″]

”मी 30 ऑक्टोबरला सेवा निवृत्त होत आहे, त्यानंतर बेटा आपण सर्वजण सोबतच राहू आणि हो माझ्या साहेबांनी आणि माझ्या सोबती असलेल्या सर्व मित्रांनी मला एक चार चाकी गाडी गिफ्ट दिली आहे. आपण खूपच मज्जा करू बेटा..! असे आपल्या मुलीला सांगत जम्मू कश्मीर या ठिकाणी सैन्यदलात देशसेवेत कार्यरत असलेल्या गणेश सोनवणे यांनी आपला फोन ठेवला. अन् नंतर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांचा फोन आला…आणि काळजाचा ठोका चुकला…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790