Amazon

नाशिक शहरातील या भागांत मंगळवारी (दि. 5 ऑक्टोबर) पाणीपुरवठा नाही

नाशिक शहरातील या भागांत मंगळवारी (दि. 5 ऑक्टोबर) पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये मंगळवारी (दि. ५ ऑक्टोबर) पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेने दिली आहे.

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 10 मधील समृध्द नगर, डीपी रस्त्यालगत 1200 मी. मी. व्यासाची ग्रॅव्हेटी मेन पी. एस. सी. पाईपलाईनला गळती सुरु आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्री साक्षी गणेश मंदिरात आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

तसेच गंगापुर डॅम, गेट जवळ 1000 मी.मी. व्यासाची रायझींग मेन डी. आय. पाईपलाईनला गळती सुरु आहे. त्यामुळे सदर ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेणे आवश्यक आहे.

यासाठी मंगळवार दि. 05 ऑक्टोबर रोजी सदर काम करण्यात येणार असुन सातपुर विभागातील खालील भागात मंगळवार दि. 05 ऑक्टोबर रोजीचा पुर्ण दिवस पाणी पुरवठा होणार नाही व बुधवार दि. 06 ऑक्टोबर रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

सातपूर विभागातील पुढील भाग: प्रभाग क्रमांक- 8, 9, 10, 11, 26 व प्र. क्र.27 भागश: मधील चुंचाळे, दत्त नगर, माऊली चौक.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8457,8437,8425″]

नाशिक पश्चिम विभागातील पुढील भाग: प्रभाग क्रमांक- 12 मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजात नगर, समर्थ नगर वनविहार कॉलनी, लव्हाटे नगर, संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांती  नगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुन नगर, मिलिंद नगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्री नगर, सहवास नगर, कालिका नगर, गुरीटी चौक परिसर इत्यादी.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाण्यात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप; नाशिक शहरापासून ५३ किलोमीटरवर केंद्रबिंदू

नविन नाशिक विभागातील पुढील भाग: प्रभाग क्रमांक- 25(भागश:परिसर)इंद्रनगरी परिसर, प्र.क्र.28 (भागश: परिसर) खुटवड नगर, माऊली लॉन्स, वावरे नगर, अंबड गांव, महालक्ष्मी नगर, प्र.क्र 27 (भागश:परिसर) चुंचाळे घरकुल योजना

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790