धक्कादायक! मूल होण्यासाठी पत्नीला मित्राशी संबंध ठेवण्यास सांगितले
नाशिक (प्रतिनिधी): मूल होण्यासाठी पतीने मित्रासोबत पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले असता तिने नकार दिल्याने गुंगीच्या गोळ्या देऊन दोघांनी आळीपाळीने ब’ला’त्का’र केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात पागोरी पिपंळगाव येथे घडली.
पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोघांना रविवारी (दि.२६) पाथर्डी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नीला मुल होत नसल्याने पतीने त्याचा मित्र राहुल शिंदे याला २२ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री 10 वाजता घरी आणले. घराची आतून कडी लावली.
तुला मूल होण्यासाठी तू राहुल शिंदेसोबत शारीरिक संबध ठेव, असे पतीने पत्नीला सांगितले. पत्नीने विरोध केल्यानंतर पतीने तिला गुंगीच्या गोळ्या दिल्याने चक्कर आली.
त्यानंतर राहुल शिंदे व पतीने तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. झालेला प्रकार कोणाला सांगितला तर ठा’र मारीन, अशी ध’म’की पतीने तिला दिली. दुसर्या दिवशी रात्री 10 वाजता दोघांनी पुन्हा तिच्यावर ब’ला’त्का’र केला. त्रास असहाय्य झाल्याने पीडित पत्नीने पाथर्डी पोलीस ठाण्यात पती व त्याच्या मित्राविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांना अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना १४ दिवसांची कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे करीत आहेत.