नाशिक: PNG ब्रदर्सला बोगस धनादेश देत ५ लाख रुपयांना गंडा
नाशिक (प्रतिनिधी): सराफ व्यावसायिकाला बोगस धनादेश देत सोने खरेदी करत ५ लाख ८४ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी संशयिताच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूररोडवरील पीएनजी ब्रदर्स येथे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संशयित संदीप दिलीप बोंडके (रा. श्रीरामपूर) या संशयिताच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[wpna_related_articles title=”More Interesting News” ids=”7994,8001,7972″]
पोलिसांनी दिलेली माहिती आणि नितीन पवार यांच्या तक्रारीनुसार, पीएनजी ब्रदर्स येथे व्यवस्थापक म्हणून काम ते करतात. संशयित बोंडकेने ५ लाख ८४ हजारांचे दागिने बुक केले. त्या बदल्यात IDBI बँकेच्या श्रीरामपूर शाखेचा धनादेश दिला होता. दुसऱ्या दिवशी येऊन संशयिताने धनादेश वटल्याचे भासवत दागिने नेले. बँकेत चौकशी केली असता धनादेश पास झाला नसल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांना तक्रार दिली. गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.