पंचवटी: वीस रुपये दिले नाही म्हणून झाला ‘त्या’ युवकाचा खू’न

वीस रुपये दिले नाही म्हणून झाला त्या युवकाचा खू’न

नाशिक (प्रतिनिधी): वीस रुपये दिले नाही म्हणून एका सराईताने फिरस्ता असलेल्या मजुराच्या ग’ळ्या’व’र क’ट्या’री’ने वा’र केला. जीव वाचविण्यासाठी ज’ख’मी झालेल्या मजुराने र’क्त’बं’बा’ळ अवस्थेत पायी साधारण अर्धा किलोमीटर चालत आल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यातच त्याचा मृ’त्यू झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयिताला अटक केली असून मृताची मात्र अद्याप ओळख पटलेली नाही.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री ९ वाजता पंचवटीतील सेवाकुंज येथे एक इसम गंभीर जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी रस्त्यावर पडलेलेल्या रक्ताच्या डागाच्या अधारे आडगाव नाका येथील दुकानांच्या बाहेरचे घटनास्थळ शोधले.

मृताचे नाव सुनील असल्याची माहिती मिळाली आहे. तो फिरस्ता असून बिगारी काम करत गंगाघाट परिसरात राहत असल्याचे मोनु बसोड, दिनेश नायर या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मिळेल ते काम करून आडगावनाका परिसरातील दुकानांच्या बाहेर रात्री झोपत असल्याची माहिती मिळाली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

पंचवटी पोलिसांनी परिसरात रस्त्यावर दुकानांच्या समोर झोपलेल्या काही फिरस्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री दोघांमध्ये बीडी पिण्यास पैसे दिले नाही म्हणून वाद झाल्याची माहिती त्यांनी दिली. पथकाने वर्णनाच्या आधारे तपोवन परिसरातील गार्डनमध्ये लपून बसलेल्या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पंडीत रघुनाथ गायकवाड उर्फ पंड्या लंगड्या असे नाव सांगितले. त्याच्या विरोधात त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चौकशीत संशयिताने बिडी पिण्याच्या बहाणा करत झोपलेल्या इसमाला उठवून त्याच्याकडे २० रुपये मागितले.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

[wpna_related_articles title=”More News From Nashik” ids=”8001,7963,7969″]

ते देण्यास नकार दिल्याने क’ट्या’री’ने वा’र केल्याची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सत्यवान पवार, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790