पंचवटी: तडीपार गुन्हेगारच निघाला मोबाइल चोर!
नाशिक (प्रतिनिधी): शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेला गुन्हेगार त्याच्या साथीदाराच्या मदतीने मोबाइल चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयिताकडून चोरीचे १३ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास झाला. याप्रकरणी राहुल भिकन कासार (रा. मायको दवाखाना, फुलेनगर), दीपक बाळासाहेब उगले (रा. भारतनगर) अशी या अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.पंचवटी-दिंडोरीरोडवर राहुल कोते भाजीपाला खरेदी करत असताना त्यांचा मोबाइल चोरी करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तडीपार केलेला सराईत गुन्हेगार राहुल कासार हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने मोबाइल चोरी करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने संशयिताचा तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने माग काढत अटक केली. चौकशीत त्याने दीपक उगले याच्या मदतीने पंचवटी परिसरातील भाजीबाजारात मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
अभिमानास्पद: ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा पहिला क्रमांक!
नाशिक: सराफावर ह’ल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
नगरसेविका पती कन्नू ताजनेंना न्यायालयाचा ५० हजार रुपये दंड
खू’न खटल्यातील फरार बंदिवान २३ वर्षांनी गुजरातमधून अटक