अजब: राहुल गांधींशी वीस वर्षांपूर्वी लग्न केल्याचा नाशिकच्या महिलेचा दावा..
नाशिक (प्रतिनिधी): तब्बल वीस वर्षांपूर्वी राहुल गांधीनी आपल्याशी लग्न केल्याचा दावा नाशिकच्या एका ४५ वर्षीय महिलेने केला आहे. नाशिकरोडच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात बुधवारी (दि. १ सप्टेंबर) सदर महिलेने या विषयावरून गोंधळ घातला..
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, नाशिकरोडच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात बुधवारी (दि. १ सप्टेंबर) एका ४५ वर्षीय महिलेने वीस वर्षांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी विवाह केल्याचा दावा केला. या महिलेने हा दावा करतांना चांगलाच गोंधळही घातला.. आपल्याकडे प्रतिज्ञापत्र असल्याचेही तिचे म्हणणे होते. बुधवारी (दि. १ सप्टेंबर) दुपारच्यावेळी ही घटना घडली.
नाशिकरोड पोलिसांनी ताबडतोब धाव घेत या महिलेची समजूत घातल्यावर प्रकरणावर पडदा पडला… याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले की, “ही महिला गोंधळ घालत असतांना पोलीस ताबडतोब घटनास्थळी हजर झाले. आणि यावेळी महिलेच्या बोलण्यात काही एक तथ्य आढळून आले नाही. या प्रकाराबत आम्ही महिलेची समजूत घातली, त्यानंतर तिने माफीदेखील मागितली.”
खरं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात ही महिला कोण, कुठली ह्या सर्व बाबी पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. त्यामुळे ह्या महिलेचा उद्देश हा फक्त राजकीय होता किंवा कसे याबाबत पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. आणि याबाबत प्रसारमाध्यमांना संपूर्ण माहिती देणेसुद्धा अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे जर हे आरोप तथ्यहीन असतील तर पोलिसांनी सदर महिलेवर कडक कारवाई करणेसुद्धा अपेक्षित आहे, अन्यथा उद्या कुणीही, कुणावरही, कुठलेही आरोप करण्यास मागे पुढे बघणार नाही. जर आरोपांमध्ये तथ्य नसेल, तर या महिलेचा बोलविता धनी कोण, हे आता पोलिसांनी शोधणे गरजेचे आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) पाणीपुरवठा नाही
नाशिकच्या सिडकोमध्ये तरुणाचा खू’न; लागोपाठ दुसरी घटना
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक शहरात गुरुवारी (दि. २ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !