Amazon

महत्वाची बातमी: नाशिक शहरात ‘या’ तारखेपासून नो हेल्मेट, नो पेट्रोल ! पंपांवर सीसीटिव्ही !

महत्वाची बातमी: नाशिक शहरात ‘या’ तारखेपासून नो हेल्मेट, नो पेट्रोल ! पंपांवर सीसीटिव्ही !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात आता दुचाकीचालकांना हेल्मेट वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यांच्याकडे हेल्मेट नसल्यास त्यांना पेट्रोल मिळणार नाही, या आदेशाची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी अधिसूचना जारी केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार २१ जुलै २०१६ आणि ५ ऑगस्ट २०१६ अन्वये ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चे धोरण निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन यांची जबाबदारी निश्चित केली आहे. तसेच गृह विभागानेही १९ मे १९९० च्या अधिसूचनेन्वये पोलिस आयुक्तांना आयुक्तालय हद्दीसाठी सार्वजनिक सुरक्षा हितासाठी मोटार वाहन चालविण्यावर वाजवी निर्बंध घालण्याचे अधिकार दिले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

त्यानुसार पोलिस आयुक्त दीपक पांडेय सर्व पेट्रोलपंपमालकांना आदेश देत हेल्मेट परिधान केलेल्या चालकालाच पेट्रोल द्यावे, हेल्मेट नसेल तर इंधन देऊ नये असे धोरण शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीसाठी लागू केले आहे. याकरिता पोलिस आयुक्तांनी अधिसूचना काढली आहे. विनाहेल्मेट चालकाला पेट्रोल दिल्यास अशा दुचाकीस्वाराचा नमुना फार्म प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास

पंपावरील सीसीटीव्ही चित्रीकरण: पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आदेश आहेत. या कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग किमान ४५ दिवस पंपचालकाला जतन करावे लागणार आहे.
इगतपुरीच्या व्हिंटेज व्हॅली येथे महिलेवर अत्याचार; एकास पोलिस कोठडी
Amazon देतंय किराणा मालावर घसघशीत सुट.. ऑफर फक्त आजच्यासाठीच मर्यादित..

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790