ब्रह्मगिरीवर कोसळली दरड; दोन जण जखमी

ब्रह्मगिरीवर कोसळली दरड; दोन जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): अनधिकृत उत्खननामुळे चर्चेत ब्रह्मगिरी डोंगरावरील संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही. गेल्या आठवड्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे ब्रह्मगिरीकडे जाण्यासाठी असलेल्या रेलिंग अन् पायऱ्यांवर गुहेच्या वरच्या बाजूने दरड कोसळण्याची घटना सोमवारी (दि. २६) घडली. यात प्राथमिक माहितीनुसार नाशिकरोड येथील दोन जण किरकोळ जखमी झाले, त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पुजारी किरण देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की नेहमीप्रमाणे मी जटा मंदिर व मुळगंगेवर दिवाबत्ती करण्यासाठी गेलो होतो. दगडी पायऱ्या चढून गेल्यावर ही गुफा लागते. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान दरड कोसळली. परंतु, सध्या कोरोनामुळे भाविक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. आठवड्यापूर्वीच गंगाद्वार येथेही दगड कोसळण्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा याच भागात शिळा कोसळल्याने येथील स्थानिक, जंगलातील डोंगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर प्रशासन, वनविभागाने योग्य सुरक्षाव्यवस्था उभारण्याबाबतही मागणी केली आहे.

मात्र “ही दरड नसून दगडं कोसळली आहेत. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागातून दगड निखळत आहेत. ब्रह्मगिरीच्या उत्खनन करण्यात आलेल्या भागाकडे हे घडलेले नाही. त्याचा या घटनेचा कुठेही संबध नाही.” असे  इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी म्हंटले आहे.
Android मोबाईल वापरताय? बोट्स कंपनीच्या ब्लूटूथ इअर बड्सवर इथे मिळतोय मोठा डिस्काउंट !

5 Total Views , 1 Views Today

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790