Amazon

नाशिक: आता लसीकरण करण्याआधी तिथेच होणार अँटीजेन टेस्ट..!

नाशिक (प्रतिनिधी): मिशन झिरो व मिशन लसीकरण अतंर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात अँटीजेन टेस्ट केंद्र सुरू करण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिकेतर्फे ३१ लसीकरण केंद्र सुरु आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: घराची किल्ली न सापडल्याच्या कारणावरून १९ वर्षीय पत्नीची हत्या; २१ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा

त्याठिकाणी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये. त्यासाठी लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची अँटीजेन टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. जेणे करून कोणी नागरिक  त्याठिकाणी सुपर स्प्रेडर असल्यास कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

तरी नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रावर आल्यास त्यांनी अँटीजेन टेस्ट करून लस घ्यावी व नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790