नाशिक शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा घट झाली आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी 3661 इतके कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १९५४, नाशिक ग्रामीण: १६७०, मालेगाव: १६ तर जिल्हा बाह्य: २१ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ३७ मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १३ तर नाशिक ग्रामीण: २४ असा समावेश आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १)आडगाव, नाशिक येथील ७९ वर्षीय वृद्ध पुरुष, २) फ्लॅट क्र.१३/१० नवरंग मंगल कार्यालय,पेठरोड, पंचवटी,नाशिक येथील ६६ वर्षीय वृद्ध महिला, ३) फ्लॅट क्र.८,श्रेया अपार्टमेंट, कौसल्या नगर, रामवाडी, नाशिक येथील ४४ वर्षीय महिला, ४) फ्लॅट क्र.११,इंदिरानगर आत्मविश्वास नगर,नाशिक येथील ५१ वर्षीय महिला, ५) ४६/१० रेणुका निवास, वृंदावन कॉलनी, मखमलाबाद,नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्ती, ६) फ्लॅट क्र.४०४,गुरुकृपा, बनारसी नगर,हिरावाडी येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष, ७) पवन नगर,सिडको, नाशिक येथील ४५ वर्षीय महिला, ८)४२१२,नागचौक,पगारे चाळ,पंचवटी येथील ५६ वर्षीय पुरुष व्यक्ती, ९) मातोश्री बंगला,चंद्र लक्ष्मी सोसायटी,जुना सायखेडा पंचक जेलरोड नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिला, १०) बेलदारवाडी, घ.नं.११, दिंडोरी रोड,नाशिक येथील ४२ वर्षीय व्यक्ती, ११) नाशिक रोड,नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्ती, १२) उंटवाडी,नाशिक येथील ४५ वर्षीय महिला, १३) विजय ममता थिएटर जवळ,नाशिक रोड येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्ती असा समावेश आहे.