नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनने कुठलाही फायदा होत नसल्याने आता संपूर्ण कडक लॉकडाऊन करावा लागू शकतो असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.
नाशिकमध्ये सध्या लोकं विनाकारण फिरत आहेत, दुकाने उघडी दिसताय, काही लोकं अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरताय, हे योग्य नाही. प्रत्येकाने आपली आणि इतरांची काळजी घ्यायला पाहिजे. सध्याचे कोरोनाचे आकडे पाहता परिस्थिती गंभीर होत चालली आहे असे दिसतेय. त्यामुळे आता कडक लॉकडाऊन लावावा लागेल. याबाबत माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे, लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवाय व्यापारी संघटनांनी सुद्धा संपूर्ण लॉकडाऊन केला तर आमचा पाठींबाच असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.