नाशिकच्या कोरोना रुग्ण आणि कोरोना संशयितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साहजिकच दिवसाला हजारो संशयित रुग्ण नमुने तपासणीसाठी देत आहेत. पण गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे रिपोर्ट्स येण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे आता दातार जेनेटिक्सने याबाबत महत्वाचे पाऊल उचलले आहे.
दातार जेनेटिक्सने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक दिले आहे. दातार जेनेटिक्स सध्या वाढता ताण लक्षात घेता विशेष उपाययोजना करत आहेत. यात अत्यवस्थ आणि आपत्कालीन रुग्णांसाठी तत्काळ सेवा (६ ते ८ तासांत रिपोर्ट), ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, अत्यवस्थ रुग्ण, दिव्यांग व्यक्ती व गरोदर स्त्रिया यांचे नमुने प्राधान्याने घेण्याची सुविधा व तत्काळ सेवा., कलेक्शन सेंटरचा कालावधी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत तसेच स्मार्ट फोन धारकांसाठी फास्ट ट्रॅक सुविधा देण्यात आल्या आहेत.