जिल्हाधिकारी म्हणतात, सर्वांना त्यांच्या नोंदवलेल्या मागणीच्या प्रमाणात मिळाले आहे..
नाशिक (प्रतिनिधी): शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार आता गरजू रुग्णांसाठी थेट रुग्णालयांनाच रेमडेसीव्हीरचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातल्या 101 हॉस्पिटल्सना 4153 रेमडेसीव्हीरचे वितरण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हंटले आहे.
जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणतात, “सर्वांना त्यांच्या नोंदवलेल्या मागणीच्या प्रमाणात मिळाले आहे व पहिल्याच दिवशी मागणी पूर्ण करता आली. काल मी स्वहस्ते चार्ट तयार करून कार्यपद्धती ठरवून दिली होती त्यावर आज आमच्या टीमने कष्टपूर्वक प्रत्यक्ष अंमलबजावणी केली याचा आनंद आहे. या सर्व कार्यपद्धतीबद्दल हॉस्पिटल असोसिएशन ने समक्ष भेटून दुपारी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातल्या 101 हॉस्पिटल्स ना 4153 इंजेक्शन चे वितरण केले आहे. यामध्ये शासनाने 10/4/2021 रोजीच्या आदेशाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या सर्व रुग्णांना इंजेक्शन आज मिळाले आहे.”
रेमडेसीव्हीरसाठी या ईमेलवर नोंदणी करावी:
ज्या कुणाला रेमडेसीव्हीरची गरज असेल त्यांनी remdecontrolnashik2021 at gmail dot com येथे नोंदणी करावी. यासाठी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना नव्हे तर रुग्णालयांना प्रिस्क्रिप्शनसह विहित नमुन्यात ऑनलाईन अर्जाद्वारे मागणी करता येईल.