वादग्रस्त स्मार्ट बससेवेला ब्रेक; जूनपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा !

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्याबाबत असलेले निर्बंध लक्षात घेत मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी वार्षिक ३५ कोटी तोटा असलेल्या वादग्रस्त स्मार्ट बससेवेला ब्रेक लावत त्या जूनपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चनंतर शाळा व महाविद्यालय जूनपर्यंत बंद रहात असल्यामुळे प्रवासी मिळणार नाही. उगाच पालिकेच्या तिजोरीवर भार नको या विचारातून महापालिका आयुक्त जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790