नाशिक (प्रतिनिधी): सातपूर परिसरातील गंगापूर ते महिरवणी रोड एका धावत्या चारचाकी वाहनाने मंगळवार १६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अचानक पेट घेतला. यात वाहन चालक हा गंभीररित्या भाजला गेला आहे.
घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,चुंचाळे येथील पाण्याची टाकी येथे राहणारे कैलास निवृत्ती शिंदे हे मुंबई वरून आपल्या मालवाहतूक चारचाकी महिंद्रा बँलेरॉ गाडी क्रमांक एम.एच१५ एफव्ही ७९३५ गंगापूर – महिरावणी रोड वरून शिवाजीनगर येथे राहणाऱ्या आपल्या मावस भावाला भेटायला जात असताना वासळी व पिंपळगाव शिवाराजवळ गाडीने अचानकपने पेट घेतला.यामध्ये वाहन चालक कैलास हे भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत, कसेबसे चालकाने गाडीतून उडी घेत आपला जीव वाचण्याचा अतोनात प्रयत्न केला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
तर घटनेत वाहन हे पूर्णपणे जळून खाक झाले आहे. स्थानिकांनी सदर घटनेची माहिती सातपूर पोलीस स्टेशन आणि अग्निशमन दलास दिली असता अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचवून त्वरित आग विझवली.घटनेतील जखमीला रात्री च्या सुमारास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार साठी दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.याबाबत अधिक तपास नाशिक पोलिस करत आहे.