नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांत कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हाप्रशासनाबरोबरच महानगर पालिका निरनिराळ्या उपाययोजना ,जनजागृती करत आहेत. नाशिककरांसाठी आता दिलासादायक बातमी आहे.सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक मोठी घट होताना दिसून येत आहे.
गेल्या 24 तासात जिल्ह्यात फक्त 52 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर,एकीकडे महापालिकेकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात 39.50 टक्के नागरिकांमध्ये कोरोना अँटी बॉडीज आढळून आल्याचे समोर आले आहे.
नाशिक शहरातील सहा विभागात हे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाचा धोका आता कमी होताना दिसतोय, असे चित्र जरी असले तरी मात्र नागरिकांनी प्रशासनाणे घालून दिलेल्या नियमांचं पालन करण देखील तितकेच आवश्यक आहे. कोरोना बाबत प्रशासनाला सहकार्य केल्यावर आणि दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करत, कोरोनाचा धोका लक्षात घेता स्वतःची काळजी स्वतः घेतल्यावरच आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो हे देखील नागरिकांनी विसरून चालणार नाहीये.. असे केल्यावरच आपण कोरोना सारख्या महामारीवर मात करू शकणार आहोत.