सीबीएस जवळील हॉटेलमध्ये प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीचा तिच्याच प्रियकराने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही घटना जुने सीबीएस जवळील एका हॉटेल मध्ये घडली असून, संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अर्चना सुरेश भोईर (वय २१, रा.बोईसर, ठाणे) ही नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाला असून, शिक्षणासाठी नाशिक येथे आली होती. तर, तन्मय प्रवीण धनवा (वय २१, रा. कोळीपाडा, पालघर) हा युवतीचा प्रियकर असून, हा देखील नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. दरम्यान, मंगळवारी (दि.१२ जानेवारी) रोजी दुपारी ३ वाजता या दोघांनी सीबीएस जवळील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

बुधवारी ते दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून चेक आउट करणार होते. मात्र, रात्री दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. अर्चना जोरात ओरडत असल्याने संशयिताने तिचा आवाज बंद करण्यासाठी उशीने तिचे तोंड दाबून धरले. यामध्ये तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. संशयित रात्रभर तिच्याजवळ तसाच बसून होता. तर, सायंकाळी त्याने फोन करून पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईक आणि युवतीचे वडील सुरेश भोईर हे देखील घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, तन्मयविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, तन्मयने त्यांच्या मुलीला हॉस्टेलवर असतांना मारहाण केली.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्नॅचिंगचे एकूण २० गुन्हे उघड, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

तर, तिचा फोन मंगळवारपासून लागत नव्हता. म्हणून, हॉस्टेलवर चौकशी केली असता, ती तेथे नसल्याचे समजले. त्यानेच तिला दमदाटी करून हॉटेलवर आणले. मुलीने सांगितले होते. तन्मय तिला त्रास देत होता. त्यानेच तिचा खून केला. असा दावा मयत तरुणीच्या वडिलांनी केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790